Google Ad
Uncategorized

शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने आरोग्य तपासणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २५ सप्टेंबर २०२३ :  स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणीसारखे विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविले जात आहेत,शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, हा या उपक्रमांचा हेतू आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आपले सफाई मित्र दिवसरात्र काम करत असतात, पण ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे बऱ्याचदा शक्य होत नाही त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या आरोग्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असून सफाई कर्मचाऱ्यांनीही वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करून सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

प्रभाग क्रमांक ९ मधील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, स्केटिंग ग्राऊंड, मासुळकर कॉलनी, अजमेरा येथे अ, क, इ, फ क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

या शिबिरास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, राजेश आगळे, अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय अधिकारी,सहकारी सहाय्यक आरोग्याधिकारी, आरोग्य निरिक्षक तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.

‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ च्या दुसऱ्या भागात १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर रोजी महापालिका रुग्णालयांमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महानगरपालिका तसेच संस्थांचे सर्व स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तपासणी करण्यात आली.

आज सुमारे १ हजार १७३ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३ कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब अशी लक्षणे आढळल्याने रुग्णालयांकडे शिफारस पत्र (रेफर चिट) देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून मिळाली.

शिबिराच्या सुरूवातीस सर्व उपस्थित अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांनी “आम्ही स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहू आणि स्वच्छतेसाठी वेळही देवू. आम्ही स्वत: घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम आम्ही स्वत: पासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्लीपासून, आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरूवात करू. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वत: घाण करीत नाहीत व घाण करू देत नाहीत. या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मोहीमेचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल, अशी स्वच्छता शपथ घेतली तसेच माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्रण शपथ देखील घेतली.

त्यानंतर स्त्री व पुरूष सेवकांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘स्वच्छ भारत अभियान नागरी २.०’ अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.सफाई मित्र आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी केले तर जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचालन, स्वच्छता तसेच पंचप्रण शपथेचे वाचन आणि आभार प्रदर्शन केले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!