Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . करीता केंद्र सरकारकडून र.रु .४९ कोटीचा निधी प्राप्त ..

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ३ सप्टेंबर) : गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, सरकारच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या फेरीमध्ये भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट प्रपोजल (एससीपी) ची निवड करून १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली.

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानांतर्गत तिस-या टप्प्यात निवड झालेल्या पिंपरी चिंचवड शहराकरीता केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या विविध विकासकामे, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता तिसरा हप्ता म्हणून र.रु. ४९ कोटी इतका प्रकल्प निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला आतापर्यंत र.रु.५८७.८४ कोटी निधी मिळाला आहे. केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका २५ टक्के असा एकूण निधी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणा-या विविध विकासकामांकरीता उपलब्ध् केला जातो. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. शासननिर्णय क्रमांक स्मार्टसि-२०२१/प्र.क्र.१६१/नवि-३३ नुसार केंद्र शासनाकडून तिस-या टप्प्यातील र.रु. ४६.५० कोटी प्रकल्पनिधी तर प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता र.रु. २.५० कोटी रुपये असे एकूण र४९ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.

त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्याची र.र. २४.५० कोटी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून सदरचा निधी जिल्हाधिकारी पुणे कोषागारातून आहरित करून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वहिस्सा र.रु. २४.५० कोटी वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असून आठवडाभराच्या कालावधीत हा निधी स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध होणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago