महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसदस्य सुरेश भोईर, माजी नगरसदस्या अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, नितीन देशमुख, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड उपस्थित होते.
१८ एप्रिल १८९८ रोजी स्वातंत्र्यपूर्व क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. या घटनेला आज १२४ वर्षे पूर्ण झाली. दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव हरी चापेकर यांना ८ मे १८९८ तसेच बाळकृष्ण हरी चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. महादेव विनायक रानडे यांना देखील १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आले. भारतमातेसाठी एकाच घरातील तीन सख्खे भाऊ तरूण वयात फाशी जाण्याची देशातील पहिलीच घटना आहे. अशी माहिती क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीकडून मिळाली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…