पिंपरी चिंचवड महापालिकेने कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेची केली उचलबांगडी … दाखविला घरचा रस्ता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेला घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. ऑटो क्लस्टर कोव्हिड हॉस्पिटलमधील रुग्णांना सेवा देण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं होतं. मात्र त्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेचे अनेक गैरप्रकार समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.

त्यानंतर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श संस्थेची उचलबांगडी केली. मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली होती. यावरून महापालिका सभागृहात तब्बल पाच तास वादळी चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी तोंड सुख घेतानाच, स्पर्श संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसा गुन्हा दाखल होताच, स्पर्शच्या दोन डॉक्टरांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.

मग रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी एका वॉर्ड बॉयला अटक झाली. ही उजेडात आलेली दोन ताजी प्रकरणं तर याआधीच महापालिकेकडून बनावट बिलं देऊन लुबाडल्याची चौकशी ही सुरु आहे. बेडसाठी आकरलेले पैसे आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा आणखी प्रकरणं समोर येऊ लागली.

एकामागे एक प्रकरणं समोर येत असल्याने कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असंतोष वाढू लागला होता. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येत आली होती. स्पर्शच्या सेवेवरून तोंडी तक्रारींचा तर भडीमारच सुरू होता. म्हणूनच पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत, स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. त्यालाच अनुसरून पालिका आयुक्तांनी स्पर्शला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे उद्यापासून महापालिका इथं सर्व रुग्णांना सेवा देणार आहे. स्पर्शच्या व्यवस्थापनाची इथून हकालपट्टी झाली असली तरी स्टाफ मात्र तसाच कार्यरत राहणार आहे. या स्टाफला महापालिकेकडे वर्ग करण्यात आलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

2 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago