पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई घुले यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची त्यांच्या दुकानावर जाऊन कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली.  आज (शनिवारी) 289 व्यापा-यांची चाचणी केली. त्यामध्ये 1 जणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. दर 15 दिवसांनी व्यापा-यांची चाचणी केली जाणार असल्याचे उपमहापौर घुले यांनी सांगितले.

भोसरी रुग्णालयातील डॉ. शिल्पा जैन, रोशनी वानखेडे, अर्चना कांबळे, कोमल लोंढे, शेखर राऊत, आनंदा नानेकर, बाळासाहेब कार्ले, आदित्य शिंदे यांच्या टीमने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते.

उपमहापौर घुले म्हणाल्या, ”शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी, आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले या अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांचा दररोज विविध नागरिकांशी संपर्क येतो. एखादा व्यापारी पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या दुकानात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी ‘सुपर स्प्रेडर्स’ होऊ शकतात. त्यामुळे व्यापा-यांची नियमितपणे दर 15 दिवसाला चाचणी केली जाणार आहे”.

”मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची अँटिजेन चाचणी केली जाते. बोपखेल भागातील 289 व्यापा-यांची चाचणी केली. त्यामध्ये 1 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना उपचाराचा सल्ला दिला. दर 15 दिवसांनी व्यापा-यांची चाचणी केली जाणार आहे. यामुळे कोरोनाचे तत्काळ निदान होऊन योग्यवेळी उपचार मिळतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल आणि कोरोनाचा प्रसार नियंत्रणात रहाण्यासाठी मदत होईल”, असेही उपमहापौर घुले म्हणाल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

41 mins ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

19 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

23 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago