अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या बॅक स्टेज सभासदांना विमा वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामगार वर्गातील सभासदांना अपघाती विमा पॉलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. आनंदी वास्तूचे सुप्रसिद्ध वास्तु तज्ञ आनंद पिंपळकर यांनी हा विमा पुरस्कृत केला आहे. विमा पॉलिसीचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश परदेशी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व राष्ट्रीय निमंत्रक आरपीआय वि आ (आठवले) तसेच कायदेशीर सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ॲड मंदारभाऊ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, खजिनदार संजय ठूबे,सहकार्यवाह निकिता मोघे, संवाद पुणेचे सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, अभिनेत्री अश्विनी शेंडे, अभिनेत्री श्रुतिका चौधरी, हडपसर कलासंघाचे योगेश गोंधळे, अभिनेत्री व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महिला समारंभ समिती सदस्य स्वाती हनमघर, सुशील सर्वगौड- अध्यक्ष रिपब्लिकन चित्रपट आघाडी, लेखक दिलीप मोरे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी आनंद पिंपळकर आपल्या मनोगतात म्हणाले की, आलंय माझ्या राशीला या चित्रपट निर्मिती दरम्यान बॅकस्टेज कामगारांचे कष्ट आणि व्यथा लक्षात आल्या. या लोकांना अडीअडचणी प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून अपघाती विमा पॉलिसी देण्याचे ठरविले व त्याचे प्रातिनिधिक वितरण आज मला करता आले याचे समाधान वाटते. प्रवीण तरडे यांनी आनंद पिंपळकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे मनोमन कौतुक केले व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आपल्या सभासदांसाठी हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल माननीय अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना धन्यवाद दिले.

प्राजक्ता गायकवाड, रमेश परदेशी, ॲड मंदारभाऊ जोशी यांनी आनंद पिंपळकर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला धन्यवाद दिले. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आनंद पिंपळकर यांच्यासारखे दानशूर दाते महामंडळाच्या सभासदांना अशी मदत करतात त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही चित्रपट महामंडळ आपल्या सभासदांना काही ना काही मदत देऊ शकते,अशी भावना व्यक्त केली. सहकार्यवाह निकिता मोघे आणि खजिनदार संजय ठुबे यांनी उपस्थितांचे आभार मानले व हा छोटेखानी कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम पार पडला असे सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

14 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago