Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांची दुस-या टप्प्यातील ड प्रभाग आढावा बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ जुलै २०२१) : विकासकामांना गती देण्यासाठी आपसातील समन्वय महत्वाचा असून दर्जेदार सुविधा प्रत्यक्ष साकारत असताना त्यात त्रुटी राहत नाही असे मत आयुक्त राजेश पाटील यांनी केले. महापालिकेच्या औंध रावेत रस्त्यावरील ड क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. २८ आणि २९ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रभाग क्र. २८ आणि २९ मधील विविध समस्या, अतिक्रमण, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.  बैठकीस जैव व विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य बापू काटे, नाना काटे, नगरसदस्या चारुशीला कुटे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, सहशहर अभियंता अशोक भालकर,ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, अजय सुर्यवंशी, अनिल शिंदे, विलास देसले, सहाय्यक आरोग्याधिकारी अजय जाधव आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसदस्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावी, नगररचना विभागाने काटेवस्तीकडे जाणारा रस्त्याची मोजणी करावी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्यातून पाणीपुरवठा सुरु करावा, प्ले ग्राऊंडचे काम पूर्ण करावे, परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, लिनीयर गार्डनचे उर्वरीत काम पूर्ण करावे.  स्मार्ट सिटी आणि योगा पार्कची कामे गतीने करण्यात यावी, बीआरटी  रस्ता तातडीने करावा, हॉकर्सचे योग्य नियोजन करण्यात यावे, स्मार्ट सिटी आणि प्रभागामध्ये समन्वय असावा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे आदी समस्या आयुक्त राजेश पाटील यांचेकडे मांडल्या.

Google Ad

यावेळी आयुक्त पाटील म्हणाले स्मार्ट सिटीच्या कामाच्या अंमलबजावणीमध्ये कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या या कामांसाठी आवश्यक असणा-या मनुष्यबळावर कोरोना लाटेता परिणाम झाला. आता अधिक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे.  तसेच कामांना गती देखील देण्यात आली आहे. संपूर्ण शहरामध्ये युटीलीटी प्लॅन महापालिका तयार करणार असून त्यामुळे रस्ते खोदाईमुळे येणा-या अडचणी उद्भवणार नाहीत.  शहर कचराकुंडीमुक्त करण्याची संकल्पना राबविणार आहे असे सांगून त्यांनी स्मार्ट सिटीशी संबंधित भूसंपादनाचे काम तत्परतेने मार्गी लावावे अशा सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!