Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रं. १६ साई नगर मामुर्डी येथे स्नेहा गाडे यांच्या वतीने आनंदात पार पडला दिवाळी फराळ व स्नेह मेळावा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ नोव्हेंबर) :  आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.१६ मध्ये साई नगर मामुर्डी येथे दिवाळी फराळ व स्नेह मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Google Ad

यावेळी सौ उज्वला ताई गावडे(महिला मोर्चा शहराध्यक्ष), श्री बिभीषण चौधरी(स्वि.नगरसेवक), श्री.सोमनाथ भोंडवे(उद्योजक) श्री.निलेश भोंडवे, श्री मनोज थोरवे (प्रभाग युवा मोर्चा अध्यक्ष), हे उपस्थीत होते. प्रभागातील २५० महिला बंधूभगिनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.यावेळी चांगले कार्य करणार्‍या पाच महिला बचत गटाचा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजक सौ स्नेहा गाडे, सौ. सारिका पटेल, सौ वैशाली चौरे, सुवर्णा सुतार, साई नगर मामुर्डी मधील सर्व सोसा.चे पदाधीकारी व नागरिकांनी फराळ व अल्पोहाराचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन सौ स्नेहा गाडे आणि उन्नती महिला मंच यांच्या वतीने करण्यात आले.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!