ही गरज ओळखूनच कोरोना संसर्गाच्या संकटकाळात
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांना वरदान ठरणाऱ्या प्लाझ्माची गरज भागविण्यासाठी या भव्य रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक १ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत नवी सांगवीतील साई चौक येथील संस्कृती लॉन्स येथे कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात आले.
शिबिराचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या हस्ते सकाळी ठीक ९ वाजता शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी वेळेअगोदरच तरुण रक्तदाते उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा २ लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला असून त्याच बरोबर प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व मास्क भेट देण्यात देण्यात आले .
🩸‘चला एक जीव वाचवूया’ … ‘रक्तदान व प्लाझ्मादान करूया’ … या मोहिमेत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग!
रक्तदानाची व प्लाझ्मा दानाची गरज आजच्या या संकटात अधिक व्यापक प्रमाणत असल्याने, प्लाझ्मादान कोरोनाच्या संकटात रुग्णांना वरदान ठरत असल्याचे, कोरोनाच्या या पार्श्वभूमीव आम्ही प्लाझ्मादान करणेबाबत नागरिकांना विशेषतः युवाकांना आयोजक प्रशांत शितोळे यांनी भावनिक आवाहन केले होते, या आवहानास इतका प्रतिसाद मिळाला की सकाळी ११ वाजेपर्यंत १२५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले, होते यात अनेक महिलांचाही सहभाग दिसून आला, तर काहींनी सहकुटुंब रक्तदान केले.
कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता या शिबिराचे आयोजन केले असल्याचे यावेळी आयोजक ‘प्रशांत शितोळे’ यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की “आज सकाळीच पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात असूनही तरुणांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे मी त्यांच्या दौऱ्यास उपस्थित राहू शकलो नाही, कारण अजितदादांनीच सांगितले की, आपणांस नागरिकांचा आपल्या जनतेचा जीव महत्त्वाचा आहे.
या शिबिरात ५५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले. तर २५ दात्यांचे प्लाझ्मा रक्त तपासणी साठी पाठविले आहेत. अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले, यात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट , पार्थ पवार फाऊंडेशन , सिझन ग्रुप सोशेल वेल्फेअर ट्रस्ट , सुवर्णयुग प्रतिष्ठान , शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, रणझुंजार मित्र मंडळ , समर्पण युवा ट्रस्ट, ओमसाई ट्रस्ट, युवाशक्ती ट्रस्ट , आई प्रतिष्ठान, जगदंब युवा प्रतिष्ठान या संस्थांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे दिसून आले.
या शिबिरास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक मयूर कलाटे, विक्रांत लांडे पंकज भालेकर यांनी भेट दिली व रक्तदात्यांचे कौतुक केले.
यावेळी आयोजक प्रशांत शितोळे आणि सौ. शीतल शितोळे तसेच शिवाजी पाडुळे, नगरसेवक नवनाथ जगताप, तानाजी जवळकर, राजेंद्र जगताप, निखिल चव्हाण, शाम जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, पंकज कांबळे, राजेंद्र तनपुरे, सुनील ढोरे, महेश माने, साहेबराव तुपे, मोहन कंबळे, महेश भागवत, संजय यादव उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…