पिंपळेगुरवमधील ‘शुभम गायकवाड’ च्या कर्तुत्वाला सलाम … वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी कोविड हॉस्पिटलला ५० हजारांची केली मदत!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १ मे) : पिंपळेगुरवमधील शुभम गायकवाड या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसावर होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आयुश्री कोविड हॉस्पिटलला ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते हॉस्पिटल प्रशासनाला धनादेश सुपूर्त करण्यात आला. कोरोना महामारीत समाजाला आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून शुभमने कोरोना रुग्णांना उपचारांसाठी मदत देऊन माणुसकी जपली आहे.

या मदतीबाबत शुभम गायकवाड म्हणाला, “मी दरवर्षी माझा वाढदिवस थाटामाटात साजरा करत असतो. पण कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे आज लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोणाच्या नोकऱ्या गेल्यात, कोणाचे व्यवसाय बंद झाले, कोणाकडे उपचारासाठी पैसे नाहीत, कोणाचे उपचाराअभावी मृत्यू झाले, अशा अनेक कारणांमुळे समाजातील हे विदारक चित्र पाहून माझे मन हेलावले आहे. त्यामुळे मी यावर्षी वाढदिवसाला एकही रुपया खर्च न करता गोरगरिबांसाठी छोटीशी मदत करण्याचा निर्णय घेतला. म्हणून ५० हजार रुपये आयुश्री कोवीड हॉस्पिटला सुपूर्त केले आहेत.”

शुभमच्या या निर्णयाबद्दल बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, “शुभमचा आदर्श सर्व तरुणांनी घेण्याची ही वेळ आहे. कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना जमेल तशी आपल्या परीने तरूणांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.”

यावेळी माऊली जगताप, शुभम गायकवाड, प्राची गायकवाड, मिलिंद कंक, सतीश कांबळे, राहुल साळुंके, अक्षय काशीद, संजय मराठे आदी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago