Categories: Editor Choice

पिंपळे गुरव-सांगवीकरांची धाकधूक वाढली … पिंपरी चिंचवड मनपाच्या या प्रभागामध्ये इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ …

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.२० मे ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजू लागले … निवडणूक कधी जाहीर होईल हे माहीत नाही, पण आरक्षण जाहीर झाले तसतशी निवडणूक लढविण्यास इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच शहरातील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक व विद्यमान हे आरक्षण कसे होतेय याची वाट पाहू लागले होते, यातील एस सी आणि एस टी चे आरक्षण आता जाहीर झाले आहे. तर मध्यप्रदेश च्या धर्तीवर ओबीसी आरक्षण होते का याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत २०२२ मध्ये पुन्हा सत्तेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेतील फेरबदलातून आरक्षणावर झालेल्या परिणामामुळे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या प्रभागातील आरक्षणात बदल झाला. चऱ्होली प्रभागात अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणावरून आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्यामुळे त्या भागात प्रभाग रचनेत काही अंशी फेरबदल झाल्याने चऱ्होलीतील एसटीचे आरक्षण पिंपळे गुरवला लागू झाले. त्यामुळे पिंपळे गुरव परिसरात आमदारांच्या या भागात खुल्या वर्गासाठी इच्छुक जास्त तर जागा एक अशी अडचण होणार आहे. तर ध्यानी मनी नसताना अनुसूचित जमाती
(एस टी) प्रवर्गातील जागा वाढल्याने या उमेदवारांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता यात आमदार लक्ष्मण जगताप भाजपकडून कोणाला उमेदवारी जाहीर करतात ते पहावे लागेल.

पिंपरी चिंचवड मनपाची प्रभाग रचना आणि एसटी व एससी आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपा तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील युतीच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरात काही प्रभागात म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग ४१, ४४ व४५ उमेदवारीचा मुद्दा हा आत्तापासूनच प्रतिष्ठेचा बनला आहे.

नवी सांगवी-पिंपळे गुरव या भागात स्थानिक नागरिकांच्या बरोबरच मराठवाडा,खान्देश, विदर्भातील तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पुणे जिल्ह्यातून या भागातून आलेले लोक याठिकाणी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत, संख्या तुलनेने विखुरलेली असल्याने म्हणावी अशी नाही आणि असली तरी त्यांच्या मध्ये अनेक गटतट आहेत, तो विषय तर वेगळाच आहे. अनेक वर्षे या भागात नोकरी, उद्योग व्यवसाय करत असलेली ही जनता आता आपणही इथले गाववालेच असल्याचे सांगतात. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी ही जनता निवडणूकित भक्कमपणे उभी असल्याने त्यांना या भागाने कायमच प्रचंड मताधिक्याने विजयी केले असले तरी स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळू शकते.

या महानगरपालिका निवडणूकित आमदार जगताप यांचे धाकटे बंधू माजी नगरसवेक ‘शंकर जगताप’ यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शंकर जगताप यांनी महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषविले आहे, त्यांना राजकीय वारसा आणि पिंपरी चिंचवडच् शहराच्या राजकारणाचा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भाजपने
महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील मनपाच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी दिली आहे. शंकर जगताप यांचा शब्द म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप यांचा शब्द हे आता जनता आणि कार्यकर्त्यांना नवीन नाही, कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगवी, नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये आमदार जगताप यांनी प्रचारात पाय न ठेवताही येथील जनतेने त्यांना भरगोस मतांनी निवडून दिले, त्याला कारण ही तसेच आहे त्यांनी या भागाचा केलेला विकास आणि शंकर जगताप यांनी लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले समाज कार्य आणि जनतेचा असणारा संपर्क, हे आहे. आजही त्यांचे हे कार्य सम्पूर्ण चिंचवड भागात सुरू आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा गराडा आजही त्यांच्या मागे फिरताना दिसतो आहे, त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक ही शंकर जगताप यांना काही नवीन नाही. त्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते ‘तुम्ही आमच्या प्रभागातुन निवडणूक लढवा’… असा आग्रह करताना दिसतात.

पिंपळे गुरवला प्रभाग ४१ आणि ४४ या दोन प्रभागांत सर्वसाधारण खुल्या जागेसाठी मोठी चढाओढ असल्याने शेजारील प्रभाग क्रमांक ४५ वर अनेकांच्या नजरा आहेत. या प्रभागात नवी सांगवी, पिंपळे गुरवचा काही भाग येत आहे. इथे तीनही जागा खुल्या असल्याने सर्वच पक्षात येथे चढाओढ पाहायला मिळून अनेक इच्छुक समोरासमोर ठाकणार आहेत. जनतेचा कळवळा नसणारे अनेक चमकते तारे या प्रभागात अधूनमधून चमकताना दिसतात, त्यात जनता काम करणाऱ्या की चमको उमेदवाराला साथ देते हे येणारा काळच ठरवेल, किंवा ऐनवेळी चर्चेत नाव नसणाऱ्या सामान्य माणसाला ही उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते, यात माजी नगरसेवक शंकर जगताप यांची किंगमेकरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, हे मात्र नक्की!

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

10 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

11 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

21 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

21 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago