Categories: Editor Choice

शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी उत्तर भारतीय निष्ठावंतांना द्या..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ मे २०२२) :-   महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आकुर्डीत शिवसनेच्या पिंपरी विधानसभेची बुधवारी (दि. १८) रोजी पदाधिकारी आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील पक्ष बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, मा. आ. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात, शहर प्रमुख सचिन भोसले, पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत सेनेचे विजय गुप्ता यांनी पिंपरी चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले. उत्तर भारतीय नागरिक अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करीत आहेत. केवळ निवडणुकांपुरतेच त्यांना लक्षात ठेवले जाते. उत्तर भारतीयांच्या हितासाठी शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी पक्षातील निष्ठावंतांना देण्याची गरज निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन गुप्ता यांना दिले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

19 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago