Pune : पुण्यातील उद्याने अखेर खुली होणार , १ नोव्हेंबरपासून परवानगी

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली पुणे शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल , अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे . कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती . मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले . त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे . त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत . ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक असल्याचं महापौर मोहोळ म्हणाले . केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे .

या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घ्यावी . काळजी उत्तम प्रकारे घेतल्यास आपल्याला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते , असं मोहोळ म्हणाले . जून महिन्यात राज्य सरकारने लॉकडाऊन ५ च्या नियमावलीत सूट दिली असताना पुण्यातील १ ९९ पैकी १५० उद्याने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता . मात्र पहिल्या काही दिवसांतच नागरिकांनी घालून दिलेले नियम न पाळल्याने महापालिकेने उद्याने पुन्हा एकदा बंद करावी लागली होती .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago