पिंपळे सौदागर मधील पी. के.चौक ते कुंजीर चौक येथील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी … निर्मलाताई कुटे आणि बापू काटे यांनी केली वचनपूर्ती!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ डिसेंबर ) : पिंपळे सौदागर पि.के चौक ते कुंजीर चौक येथील जर्वरी सोसायटी समोरील रस्त्या चा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका निर्मलाताई कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापु काटे यांच्या पाठपुराव्याने यशस्वी रित्त्या मार्गी लागला आहे.

पि.के चौक ते कुंजीर चौक हा जर्वरी सोसायटी समोरील रस्ता गेली १० वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते. सदर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी जर्वरी सोसायटी मधील नागरीक,जेष्ठ नागरीक व महिला वर्गाने सतत नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांकडे पाठपुरावा केला तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या माध्यमातून जागा मालकांना त्यांच्या जागेचा योग्य तो मोबदला मिळावा या प्रामाणिक हेतुने महापालिका आयुक्त व नगररचना विभागातील आधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सदर ठिकाणच्या जागा मालकांना देण्यात येणारा टी डी आर स्वरुपातील मोबदला मंजुर करण्यात आला .

आज गुरुवार दि.१७ डिसेंबर रोजी नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे आणि नगरसेवक श्री.शत्रुघ्न बाप्पु काटे यांनी सदर रस्त्याच्या जागा मालकांसमवेत बोलणी करून त्यांच्या उपस्थितीत रस्त्यास अडथळा ठरत असलेले बांधकाम हटविण्यात आले. त्यामुळ स्मार्ट सिटी अंतर्गत येथील १८ मीटरचा सीमेंट कॉंक्रिट चा पक्का रस्ता व प्रशस्त फुटपाथ लवकरच पुर्ण होईल. जागा मालकांनी सामंजस्याने चर्चेस प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे व नगरसेवक श्री.शत्रुघ्न काटे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago