Categories: Editor Choice

मराठवाडा जनविकास संघ व मरावाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य दिव्य मराठवाडा संमेलनाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०४ जानेवारी) : गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी… मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक,हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी… मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी… मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्ष … नवीन वर्ष.. नवीन संकल्प … २०२३ निमित्त मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा ‘ जन्मभुमि कर्मभुमितील भेटीगाठी आपली माती.. आपली माणसं … भव्य दिव्य मराठवाडा संमेलनाचे आयोजन रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी. १०.०० ते १.०० या वेळेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान ,पुर्णानगर पिंपरी चिंचवड पुणे १८ या ठिकाणी मराठवाडा जनविकास संघ व मरावाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यामान करण्यात आले होते.

नविन वर्ष… नविन संकल्प .. मराठवाडा संमेलना मध्ये पुणे,पिंपरी चिंचवड, नवी मुंबई ,मराठवाडयातील ८ जिल्हे मराठवाडा नावाशी संबधीत ५० विविध संघटनाच्या सामाजीक बांधीलकीन मराठवाड्याच्या मातीसाठी एकत्र आले होते.
मराठवाडा संमेलनाचे उद् घाटन मराठावाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज अॅड. जी. आर. देशमुख,मा. श्री. सुधीर बिंदु,मा. श्री. डॉ. विवेक मुगळीकर, मा. श्री. उदय वाईकर, मा. श्री. सुभाष जावळे, मा. श्री. दिलीपराव बारडकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजनांने करण्यात आले.

देशभक्तीच्या जय घोषात मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देऊन शुभारंभ करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा सिंदगी विजापुर ते मराठवाडा ८ जिल्हे ते हैदराबाद ते पिंपरी चिंचवड ,पुणे गुरुवार दि. १२ जानेवारी ते सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ जाणार आहे त्या अनुषंगान सर्वांनी चर्चा आणि यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान देण्याचे ठरविण्यात आले.मराठवाडा संमेलनात दोन उद्घाटन करण्यात आली . मराठवाड्याचे भुमिपुत्र श्री. नितीन चिलवंत यांच्या मराठवाड्याच्या संबधीत चार संकल्प पुस्तिकांचे प्रकाशन स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजाच्या शुभहस्ते करण्यात आले त्याच बरोबर मराठवाडा भुमिपुत्र व अभिनव फांऊडेशने अध्यक्ष मा. श्री. प्रा. डॉ. प्रविण घटे यांच्या संकल्पनातुन निर्माण करण्यात आलेल्या http://www.globalmarathawada.org  या वेबसाइटचे उद् घाटन मा. श्री. एकनाथदादा पवार, श्री. अरुण पवार, डॉ. प्रिती काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज अॅड. जी. आर. देशमुख यांनी आपल्या उद् घाटन पर भाषणास सांगितले कि पिंपरी चिंचवड पुणे कर्मभुमितील मराठवाडा भुमिपुत्रांनी पवित्र माती मंगल कलश संवाद यात्राचा संकल्प केला आहे तो मराठवाड्यात यशस्वी करण्याची जबाबदारी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती घेईल हे सांगितले तसेच प्रत्येक जिल्ह्यात संवाद यात्रेच आनंदाने करण्यात येईल अस सांगितले.

प्रसिध्द वक्ता शिवभक्त मा. श्री.सुभाष जावळे यांनी आपल्या भाषणातुन मराठवाडा मागास राहण्या मागची कारणे, शासन स्तरावरील अंमलबजावणीत दिरंगाई करणारे धोरण कशी जबाबदार आहेत तसेच ३७१ कलम लागु करुन मराठवाड्याचा आर्थिक तरतुदीतुन विकास करावा याविषयीचे विचार पोटतिडकीनं मांडले.

मा. श्री. सुधीर बिंदु यांनी आपल्या भाषणात विचार व्यक्त करतानी सांगितले कि जी आपल्या जन्मभुमिची मराठवाड्याची आठवण कर्मभुमि पुणे मुंबईत वास्तवे करुन ठेवता अन् मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करतात हे वाखाण्याजोगे आणि अभिमानस्पद गोष्ट आहे असे ते म्हणाले . प्रसिध्द सिनेगायक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी गायन करणारे उत्कृष्ठ सुत्रसंचालक श्री. उदय वाईकर यांनी देशभक्तीवर आधारीत सुंदर स्वागतगीत म्हणुन मराठवाडा संमेलनातील वातावरण आनंदी केले.
मराठवाडा संमेलन कार्यक्रमाचे प्रस्तावना व संकल्पना सर्वां पुढे मराठवाडा भुमिपुत्र श्री. नितीन चिलवंत यांनी सुंदर पणे मांडली.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा. श्री. अरुण पवार यांनी मराठवाडा संमेलनातुन आपले विचार व्यक्त करतांनी सांगितले कि प्रत्येकाने आपल्या जन्मभुमि साठी वेळात वेळ काढुन थोड थोड काम केले तर आपला मराठवाडा मागास राहणार नाही तसेच ७५ वर्षाच्या इतिहासात आपल्या मराठवाडयातुन पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा देशभक्तीच स्फुल्लींग … मनामनात पेटवत निघणार आहे त्या मध्ये सर्व मराठवाडा बंधु भगिनीनी तन मन धन लावुन सहभागी व्हावं . कर्मभुमितील मराठवाडा बांधवानी आपल्या जिल्ह्यातील पवित्र माती मंगल कलश संवाद यात्राच्या स्वागतासाठी उपस्थित राहवं अस आवाहन केल . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा प्रतिष्ठान अध्यक्ष मा. श्री. एकनाथदादा पवार यांनी आपल्या भाषणातुन सांगितले कि मराठवाड्यासाठी जे जे युवक श्री. नितीन चिलवंत यांच्या सारखे चांगले काम करत असतील त्यांच्या पाठी मागे सर्वांनी खंबीरपणे उभा राहव, त्याच बरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई येथे जवळपास ५ हजार मराठवाड्यातील भुमिपुत्र यशस्वीपणे उद्योग व्यवसाय करत आहेत,

त्यांना ही एकाच मराठवाडा उद्योग विचारपीठावरुन एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करु असं सांगितल.
मराठवाडा संमेलनासाठी मराठवाडा नावावर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते त्या मध्ये मा. श्री. दिलीपराव बारडकर , श्री. प्रकाश इंगोले, श्री. मल्लीकार्जन सर्ज, श्री. भारत गोरे, श्री.गोरख भोरे, श्री. दत्तात्रय जगताप, श्री. सुनिल काकडे, श्री. शिवकुमारसिंह बायस, श्री.निळकंठ शेळके, श्री. डि. एस. राठोड, श्री. शंकर तांबे, श्री. श्रमिक गोजमगुंडे, श्री. प्रा. डॉ. प्रविण घटे, श्री. संतोष काळे, श्री. धनाजी येळेकर, श्री. मारुती बानेवार, श्री. आदिनाथ माळवे, श्री. शिवानंद चौगुले ,श्री. विठ्ठल दळवे, श्री. संदीप चव्हाण, श्री. उमाकांतआप्पा शेटे, श्री. प्रभाकर चेडे ,श्री. नामदेव पवार, श्री. वामन भरगंडे ,श्री. शाम भोसले, श्री. सुनिल नाईकनवरे, श्री. राहुल चंदेल, श्री. दत्ता थोरात ,श्री. लश्मण मुळुक, डॉ. विवेक मुगळीकर, श्री. सतिश काळे, श्री. समाधान गपाट ,श्री. प्रल्हाद लिपणे ,डॉ. यादवराव पाटील ,श्री. सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नविन वर्षाचे नवीन संकल्प मराठवाड्याच्या मातीसाठी करुन मराठवाडा संमेलन उत्साहात पार पडले.

मराठवाडा संमेलनाचे सुत्रसंचालन श्री. शिवकुमारसिंह बायस यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्योजक श्री. शंकर तांबे यांनी केले . कार्यक्रमाची सांगता संकल्प प्रार्थना व राष्ट्रगीतानं करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…

1 day ago

आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त… मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :-- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक…

4 days ago

पिंपळे गुरव येथे श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी व ऋषी पंचमी उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी…

4 days ago

२५० बेड क्षमतेसह पिंपरी चिंचवड मनपाचे तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…

5 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

6 days ago

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा … पिंपरी चिंचवड महापालिकेची गणेशोत्सवपूर्व तयारी वेगात

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…

6 days ago