Categories: Editor Choice

हिंदुस्थानच्या प्रथम आदिवासी महिला ‘द्रोपदी मुर्मू’ यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल काळेवाडी येथील पंचनाथ चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा ‘

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जुलै) : राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीसाठी सोमवारी अतिशय उत्साहात मतदान झाले होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये संसदेच्या उभय सदनातील खासदारांनी तर विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये विधानसभेच्या सदस्यांनी मतदान केले होते.

भारत देशाच्या राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला श्रीमती . द्रौपदी मुर्मु यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या सांगवी काळेवाडी मंडलाच्या वतीने कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रमुख  शंकर  जगताप व मा.महापौर उषा ढोरे, विनोद तापकीर, कैलास सानप, माजी नगरसेवक नढे पाटील, शत्रुघ्न बापू काटे यांच्या उपस्थितीत काळेवाडी येथील पंचनाथ चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा ‘ करण्यात आला .

तसेच हिंदुस्थानच्या प्रथम आदिवासी महिल ‘द्रोपदी मुर्मू’ यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल पिंपळे गुरव येथील सर्व आदिवासी समाज बांधवांकडून माजी नगरसेविका उषा मुंडे आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आदिवासी नृत्य सादर करत जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.

▶️द्रौपदी यांच्या विजयातून राजकीय संदेश

द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची घोषणा होताच देशभरात जल्लोष सुरू झाला. द्रौपदींच्या विजयाने भाजपला आदिवासी समाजासह संपूर्ण देशाला आणि विशेषतः महिलांना एक विशेष संदेश द्यायचा होता. मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या या समाजाला राजकीय संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजप हे एकमेव पक्ष सत्तेसाठी नव्हे तर देशातील वंचित घटकांसाठी काम करतात, हे आज दिसून आले. त्यामुळेच विजयानंतर पोस्टरमध्ये द्रौपदी मुर्मूंसोबत इतर कोणत्याही नेत्याचा फोटो लावू नये, अशा सक्त सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

4 hours ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

1 day ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 days ago