दि.३० मे राजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या लसीकरण केंद्रावर होणार ‘ कोव्हॅक्सिन ‘ व ‘ कोविशिल्ड’ लसीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२९मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या दि .३० / ०५ / २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ व ‘ कोविशिल्ड ‘ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे . त्यानुसार ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे .

त्या अनुषंगाने उद्या दि .३० / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थांना ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .३० / ०५ / २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने उद्या दि .३० / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या ३३ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .३० / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे . सोबत लसीकरण केद्रांची यादी जोडली आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

17 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago