Pune : पोलिस जनतेशी कसे वागतात ? जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी केला एकाला फोन , पण ‘ …

महाराष्ट्र 14 न्यूज : पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात .त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील(Dilip Walse Patil) यांनी एका व्यक्तीला फोन लावला. त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली. पण गृहमंत्र्यांनी ज्या व्यक्तीला फोन लावला होता तो निघाला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता. यावर तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली.

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी गृहमंत्री वळसे पाटील शुक्रवारी आयुक्तालयात आले होते. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी एका अर्जदाराला फोन केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली.

एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा अन् मदत दिली जाते का? ते समाधानी आहेत का? याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटीलांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी मुंढवा पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago