Google Ad
Uncategorized

शिवजयंती निमित्ताने दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम … छत्रपती शिवरायांच्या कर्तुत्वाचा जागर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि १९ फेब्रुवारी) : पोवाड्यातून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत
आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम छत्रपती शिवरायांच्या कर्तुत्वाचा जागर करण्याचा दिवस म्हणजे शिवजयंती शिवपराक्रमाची खरी प्रेरणा मिळते ती पोवाड्यातूनच निधड्या छातीने जो पराक्रम गाजविला त्याची कहाणी सांगायची तर ती दमदार अशा पोवाड्यातूनच ऐकायला हवी हे लक्षात घेऊन शिवजयंतीच्या निमित्ताने शिवशाहीर हेमंत मावळे व त्यांच्या धर्मपत्नी संगीता मावळे यांनी विजयश्री चे पोवाडे सादर केले आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.

शिवरायांचे आणि त्यांना निष्ठेने साथ देणाऱ्या मावळ्यांचे पोवाडे ऐकताना प्रत्येकाच्या मनात वीरश्री संचारत होती शिवरायांच्या पराक्रमांच्या सुवर्णक्षणांना जागवत हा एक अतिशय सुंदर सोहळा पार पडला यावेळी माझ्यासह संयोजक दत्ताभाऊ धनकवडे अश्विनी व सागर भागवत रावसाहेब कुंजीर प्राचार्य बाजीराव गायकवाड शंकरराव पाटील नानासाहेब शिंदे ओंकार धनकवडे बाप्पू सुके अर्जुन मोरे व प्रेक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!