Categories: Editor Choice

नवी सांगवीतील ‘श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट’च्या वतीने सामाजिक भान जपत अनोखा उपक्रम … आरोग्य विभागात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान!

शुभायास्तु महालक्ष्मीर्भवतां भवतारिणी । बिभ्रती शिरसा लिंगमशेषा घौघहारिणी ।।

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज (रविवार दि. ०९ऑक्टोबर) मंगलमय वातावरणात गुलाब पाणी व अत्तराचा सुगंध अतिशय मोहक व सुंदर व पवित्र वातावरणात नवरात्रीचा कार्यक्रम उत्सहात पार पडला. नवी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सार्वजनिक स्वच्छता करणाऱ्या चौसष्ठ नवदुर्गांचा सन्मान श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या महिला नातेवाईकांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्तींना हळदी कुंकू लावून गुलाब पाणी शिंपडून अत्तर लावून डोक्यावर फुलांचा वर्षाव करून साडी चोळी गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आमचा अशा प्रकारचा सन्मान प्रथमच करण्यात आला अशा भावना सत्कारमूर्ती महिलांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

अतिशय मंगलमय वातावरण झालेल्या कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता, तो म्हणजे ह .भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांचे आशीर्वाद त्यांनी आपल्या भाषणात श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट करीत असलेल्या अशा सुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तळागाळात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्याप्रती सर्वोच्च भावना ठेवून सन्मान केला हा समाजापुढे एक आदर्श आहे.तसेच ट्रस्ट करत असलेल्या विधायक कार्यात पूरग्रस्तांना मदत, अनाथ आश्रमाला मदत, मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत आरोग्य शिबीर अशा उपक्रमांचे कौतुक केले. नवी सांगवी परिसरातील सामाजिक भान असलेली ही संस्था असून त्याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले सत्कार मूर्तीना मार्गदर्शन करताना ते म्हणाले. आपणाला जो महालक्ष्मीचा प्रसाद मिळाला आहे, त्यामुळे तुम्हाला समाजाची सेवा करण्यास शक्ती मिळाली आहे असे उदगार वाघ महाराजांनी यावेळी बोलताना काढले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ट्रस्टी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाठक गुरुजी यांनी केले. यावेळी ट्रस्टच्या वतीने वाघ महाराजांचा सत्कार करण्यात आला.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

8 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

9 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

19 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

19 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago