Categories: Editor Choice

नवी सांगवीतील ‘श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट’च्या वतीने सामाजिक भान जपत अनोखा उपक्रम … आरोग्य विभागात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज रविवार दिनांक (9/10/22 – रोजी मं))मंगलमय वातावरणात गुलाब पाणी व अत्तराचा सुगंध अतिशय मोहक व सुंदर व पवित्र वातावरणात नवरात्रीचा कार्यक्रम उत्सहात पार पडला. नवी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सार्वजनिक स्वच्छता करणाऱ्या चौसष्ठ नवदुर्गांचा सन्मान श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या महिला नातेवाईकांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्तींना हळदी कुंकू लावून गुलाब पाणी शिंपडून अत्तर लावून डोक्यावर फुलांचा वर्षाव करून साडी चोळी गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आमचा अशा प्रकारचा सन्मान प्रथमच करण्यात आला अशा भावना सत्कारमूर्ती महिलांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

अतिशय मंगलमय वातावरण झालेल्या कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता, तो म्हणजे ह .भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांचे आशीर्वाद, त्यांनी आपल्या भाषणात श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट करीत असलेल्या अशा सुत्य उपक्रमाचेही कौतुक केले. तळागाळात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्याप्रती सर्वोच्च भावना ठेवून सन्मान केला हा समाजापुढे एक आदर्श आहे.

तसेच ट्रस्ट करत असलेल्या विधायक कार्यात पूरग्रस्तांना मदत, अनाथ आश्रमाला मदत, मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत आरोग्य शिबीर अशा उपक्रमांचे कौतुक केल. नवी सांगवी परिसरातील सामाजिक भान असलेली ही संस्था आहे व त्याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले सत्कार मूर्तीना मार्गदर्शन करताना ते म्हणाले , आपणाला जो महालक्ष्मीचा प्रसाद मिळाला आहे. त्यामुळे तुम्हाला समाजाची सेवा करण्यास शक्ती मिळाली आहे असे उदगार वाघ महाराजांनी काढले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ट्रस्टी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाठक गुरुजी यांनी केले. यावेळी ट्रस्टच्या वतीने वाघ महाराजांचा सत्कार करण्यात आला.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

32 mins ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago