Categories: Editor Choice

‘ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ६ मार्च २०२२) समाजावर सुसंस्कृतपणे संस्कार करणारी माता असते, तिच्या ह्रदयी प्रेमाचा पाझर असतो. प्रेमाने ती सर्व संकटांवर विजय मिळवू शकते. अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य प्रत्येक स्त्री मध्ये असते. तिला तिची सक्षमता सिध्द करण्यासाठी संधीची आणि कुटूंबांतून पाठबळ मिळण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने समाजाला आजही या स्त्री शक्तीची म्हणावी अशी ओळख झालेली नाही. यासाठी तिच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अनादी काळापासून आजपर्यंत तिची लढाई चालू आहे.

‘ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी आणि तिच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक सक्षमतेसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.

महिला दिनाचे औचित्य साधून मानिनी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. भारती चव्हाण उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, स्त्रीचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे पुरुषी मानसिकता. मग तो जाहिरातीतले प्रदर्शन असो किंवा ओंगळवण्या गलिच्छ चित्रफिती असो. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या मानसिकतेतून आजही बाहेर न पडणारी पुरुषी मानसिकता.

समाजातील, घरातील, बाहेरील शत्रूंना झेलत झेलत ‘ती’ तिची लढाई लढत असते. खरेतर ती समाजाच्या नितीमत्तेचा कणा आहे. ८ मार्च महिला दिन जवळ आला की महिला संघटना, संस्था उत्सवाच्या हेतूने तयारीला लागतात. या दिवसाचा मुख्य हेतू महिलांचे आर्थिक, सामाजिक मानसिक आणि कौटूंबिक सबलीकरण सक्षमपणे व्हावे हा आहे. मात्र सध्याच्या काळात त्याला प्रसिध्दीची जोड दिली जाते. परंतू त्यातून मुख्य हेतू साध्य होताना दिसत नाही. आपल्या जवळची कोणती स्त्री सबळ आहे का ?

आपण स्वतः तरी सबळ आहोत का ? घटस्फोटीत व विधवा स्त्रीयांना समाजात सन्मान आहे का ? हळदी कुंकू कार्यक्रमाला विधवा स्त्रीला बोलवण्याचे धाडस इतर स्त्रीया करतात का ? विनयभंग किंवा बलात्कार पिडीतेला समाज सन्मान देतो का ? असे प्रश्न आज प्रत्येक सक्षम स्त्रीने स्वत:लाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कौटुंबिक स्त्रीयांवर अन्याय अत्याचार करण्यामध्ये स्त्रीयांचाच पुढाकार जास्त असतो. यासाठी शालेय वयापासूनच स्त्री, पुरुष भेदभाव न मानता प्रबोधनाची गरज आहे.

जागतिक महिला दिनाचा इतिहास देखील महिलांनी समजून घ्यावा. अमेरिका युरोपसह जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्रियांना २० व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या अन्यायाविरुद्ध महिलांच्या मतदानाच्या हक्कांसंदर्भात ‘द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ ची स्थापना १८९० मध्ये झाली. सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आणि कामगार क्षेत्रातील महिला कामगारांच्या हक्कासाठी १९०७ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरवण्यात आली. त्यावेळी अनेक आंदोलने झाली, मतदानाच्या हक्कासाठी अनेक मोहिमा उघडल्या गेल्या, ऐतिहासिक निदर्शने झाली, परिणामी १९१८ – १९ मध्ये या मागण्यांना यश मिळाले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या ठरावानुसार ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला.

भारतात प्रथमच मुंबई मध्ये ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, तर पुणे येथे ८ मार्च १९७१ रोजी महिला दिन महिलांच्या हक्कासाठी एक मोठा मोर्चा काढून साजरा करण्यात आला. पुढे युनोने १९७५ हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्या नंतर स्त्रियांच्या समस्यांना व्यासपीठ मिळत गेले. स्त्रियांच्या समस्या ठळकपणे पुढे आल्या. महिला संघटनांना सक्षम करण्याबाबत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही संघटनांचे स्वरूप बदलले तशा संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. त्यानंतर तर ८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने साजरा होऊ लागला. आधुनिक काळात महिलांकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या व फसवणुकीच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होत आहे ही चिंताजनक आणि धक्कादायक बाब आहे. स्त्रियांच्या बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही. महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतू अद्यापही साध्य झालेला दिसत नाही. शासनाने “महिला शक्ती विधेयक” मंजूर करून महिलांवरील अत्याचाराबाबत २१ दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाचे यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त दिलेली अवर्णनीय भेटच म्हणावी लागेल. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे मानिनी फाऊंडेशन आभार व्यक्त करीत आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

4 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago