Categories: Editor Choice

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना “महापरिनिर्वारण दिना” निमित्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०६ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना “महापरिनिर्वारण दिना” निमित्त विनम्र अभिवादन” करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सुरेश भालेराव पोलीस इन्स्पेक्टर, सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड, सुनिल बगाडे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आपल्याला साधले तर आपण आल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बुध्दधम्मामुळे जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही,तोपर्यंत शांतता राहणार नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युद्ध नको बुध्द हवा.शांतीच्या मार्गाने जगावे यासाठी व माझ्या बांधवाना न्याय मिळावा; त्याच प्रमाणे समाजाला मानवासारखे जीवन जगावे ते जीवन त्यांना मिळावे. अस्पृश्यता नष्ट व्हावी त्यासाठी एकच मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर होता. म्हणूनच बुध्दाचा धम्म स्विकारला. बाबासाहेबांनी धम्म स्विकारला नि १९५६ रोजी १४ ऑक्टोबर ला गुलामीच्या बेड्या नष्ट झाल्या आणि समाज मोकळा श्वास घेऊ लागला.

“शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत: ची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, अनेक क्षेत्रात अतुल्यनीय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांनी उदगार काढले.

यावेळी न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथील सर्व विदयार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच सुनंदा साळवी सूत्रसंचालन केले व सचिन कळसाईत यांनी आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

9 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago