महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात फुगेवाडी येथे हुतात्मा भाई कोतवाल यांची ७८ वी पुण्यतिथी साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात फुगेवाडी येथे हुतात्मा भाई कोतवाल यांची ७८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे उपस्थित होते.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल चौक येथे ७८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माधवी राजापूरे, संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळूंजकर, माजी अध्यक्ष अशोक मगर, प्रदिप वाळुंजकर, जिल्हा सरचिटणीस पुंडलिक सैंदणे, विशाल जाधव, आनंद कुदळे, अध्यक्ष ओबीसी समिती सुरेश गायकवाड, सुरेश मोरे, प्रकाश तीरलापुरकर, भीष्म गायकवाड, भाऊसाहेब यादव, गणेश शिंदे, संतोष शिंदे

विशाल वाळुंजकर, यशवंत आपुणे, नितीन कुटे, हरिभाऊ शेळके, रमेश गांगुर्डे, नाना रायकर मुयुर आढाव, सिद्राम मुळे, तिरुपती सावरकर, मदन तांदळे, सुशील रसाळ, हेमंत श्रीखंडे, किशोर पवार, नागेश कोकाटे, अविनाश महाले, चेतन महाले, संदिप दळवी, राम जाधव, अमोल देवकर, मारुती काटके, रामदास जाधव, अंकुश जाधव, शेलेन्द्र वर्मा, वाल्मीक काटे, अभय श्रीमंगले, विशाल खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मगर यांनी केले. सूत्रसंचालन संदिप पंडीत यांनी केले. अशोक पंडीत यांनी आभार मानले.

यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या ” पुणे मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे ‘भाई हुतात्मा कोतवाल’ यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. हे काम लवकरच पूर्ण करणार”.

स्वातंत्र्यवीर वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवन चरित्राचा पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात महापालिका व राज्य सरकारने समावेश करावा अशी आग्रही मागणी मा. अध्यक्ष अशोक मगर यांनी केली .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्मारक उभे करण्यासाठी मान्यता दिली आहे. यासाठी दहा लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. हे काम अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहे. हे काम महापालिकेने लवकरात लवकर सुरु करावे.
अशी मागणी गणेश वाळूंजकर, शहराध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिं. चिं. यांनी यावेळी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago