Google Ad
Uncategorized

लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड आणि बघतोय रिक्षावाला फोरमच्या वतीने आकुर्डी येथे ‘सुरक्षित सारथी सुरक्षित प्रवासी’ कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मार्च) : लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड आणि बघतोय रिक्षावाला फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यु.पी.एस इंडिया प्रा.लि .यांच्या सुरक्षित सारथी सुरक्षित प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम २०२२ -२३या प्रकल्पा अंतर्गत दिनांक -२७/०३/२०२३रोजी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर.टि.ओ पिंपरी चिंचवड चे इन्स्पेक्टर शरद देशमुख लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर &रिसर्च सेंटर चिंचवड चे डॉ विशाल क्षीरसागर लोकमान्य हॉस्पिटल चे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ .जयवंत श्रीखंडे लोकमान्य आयुर्वेद प्रमुख डॉ .निनाद नाईक धनंजय काळभोर माजी नगरसेवक गुलाब कुटे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघतोय रिक्षावाला फोरम चे शहर अध्यक्ष संतोष उबाळे उपाध्यक्ष सोमनाथ म्हस्के अदि मान्यवर उपस्थित होते उपस्थित रिक्षा चालक यांना आर.टि.ओ इन्स्पेक्टर शरद देशमुख यांनी रस्ते आपघात व नियम याविषयी माहिती दिली.

Google Ad

तर डॉ .जयवंत श्रीखंडे यांनी प्रथमोपचार बेसिक लाईफ सपोर्ट प्रत्यक्षिका सह प्रशिक्षण दिले सदर कार्यक्रम साठी एकुण पिंपरी चिंचवड मधील शंभरहून अधिक रिक्षा चालक व मालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गोळे जनसंपर्क अधिकारी लोकमान्य हॉस्पिटल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ विशाल क्षीरसागर सी .ई .ओ .लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर &रिसर्च सेंटर चिंचवड पुणे यांनी मानले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!