Google Ad
Editor Choice

Delhi : यंदा मध्यमवर्गीयांवर कोणतेही नवीन कर नाही, पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त – निर्मला सीतारमण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जानेवारी) : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल, असेही सांगण्यात आले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होईल आणि 6 एप्रिलपर्यंत चालेल, ज्यामध्ये सामान्य सुट्टीसह 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ‘पांचजन्य’ या मासिकातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या की, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील का, असा प्रश्न त्यांना विचारायला हवा. असे त्या म्हणाल्या.

Google Ad

यासोबतच त्यांनी सांगितले की, पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही. मी स्वत: एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, त्यामुळे मी त्यांचे दु:ख समजते, तसेच केंद्र सरकारतर्फे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी स्मार्ट सिटी शहाराची निर्मिती तसेच मेट्रो रेल्वेचे जाळे विकसित करण्यासाठी अनेक उपाययोजना यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!