Google Ad
Editor Choice

झाडे वाचवा’, ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा हा संदेश देत १८ युवकांनी केली निगडी ते गेटवे ऑफ इंडिया सायकल नाईट राईड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : झाडे वाचवा’, ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा’! हा संदेश देण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील युवकांनी भक्ती-शक्ती निगडी ते गेटवे ऑफ इंडिया असा सायकलवरून प्रवास करून नाईट राईड करत दहा तासात हे अंतर पार केले आहे यामध्ये अठरा सायकलिस्ट सहभागी झाले होते. शनिवारी प्रसिध्द सायकलिस्ट संदिप कुलकर्णी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून भक्ती शक्ती निगडीपासून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. १५ तारखेला पहाटे गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला.

कामशेतचा घाट, खोपोलीमधील तीव्र उतार, खोपली ते पनवेल संपुर्ण अंधार अशा परिस्थितीत उत्तम टीमवर्कमुळे अंतर लीलया पार करता आले. या मोहिमेत ज्ञानेश पवार, संतोष हिंगाणे, कपिल आढाव, राहुल गायकवाड, भूषण धाडवे, संतोष दिवेकर, प्रदीप शिरसाट, तपन कुमार, अभिजीत गुजर, श्रीकांत जगताप, गणेश चिने, कुलदीप चौगुले, सुनिल झिरमिले, सचिन भोसले, विशाल नाईक, विक्रम कदम, अविनाश बेळगावकर, सचिन निफाडकर सहभाग घेतला . पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील काही युवकांनी एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी सायक्लोहोलिक नावाच्या सायकलींग ग्रुपची सुरुवात केली. कोरोना काळानंतर सायकलिंग आणि व्यायामाचे महत्त्व समजलेल्या अनेक युवक यात सहभागी झाले.

Google Ad

या ग्रुप मधील सर्व सदस्य रोज साधारण वीस ते तीस किलोमीटर अंतर सायकलिंग करतात आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी सायकल राईडचे नियोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन ‘झाडे लावा झाडे वाचवा, सायकल चालवा प्रदूषण टाळा, हा संदेश देण्यासाठी कार्य करतात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!