Google Ad
Uncategorized

Business 20 Conference : उत्पादक, ग्राहकांच्या हितांचा समतोल राखणे आवश्‍यक, ग्राहकहित दिनाचा प्रस्ताव

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑगस्ट) : आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सर्वांसाठीच कायमस्वरूपी फायदेशीर ठरण्यासाठी उत्पादक आणि ग्राहक यांच्या हितांचा समतोल राखला जाणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बड्या उद्योगांनी आपल्या दृष्टिकोनाचा विस्तार करावा. एक बाजारपेठ याच एका नजरेतून देशांकडे पाहिल्यास मोठे नुकसान होऊ शकते, ” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील उद्योगांना दिला.

पंतप्रधान मोदी यांनी ‘बिझनेस-२०’ या गटाने आयोजित केलेल्या परिषदेच्या समारोपाच्या सत्रात सहभाग घेतला. या वेळी मोदी यांनी व्यवसायासाठीच्या पारंपरिक धोरणाचा पुन्हा एकदा फेरवापर करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, ”जनतेची खरेदी करण्याची क्षमता वाढविण्यावर उद्योगांनी अधिक भर द्यावा.

Google Ad

आत्मकेंद्री दृष्टिकोन हा घातक ठरू शकतो. दीर्घकाळ व्यवसाय चांगला चालण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण करण्याकडे भर देणे आवश्‍यक आहे. मागील काही वर्षांत भारत सरकारने लागू केलेल्या काही धोरणांमुळे केवळ पाच वर्षांतच साडे तेरा कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत.

हे लोक नवे ग्राहक आहेत. या नव्या वर्गामुळेही भारताच्या विकासाला गती मिळत आहे. दुसऱ्या देशांकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहणे हे हानिकारक ठरू शकते. उत्पादक देशालाही यामुळे नुकसान होऊ शकते. विकासाच्या या चक्रात सर्वजण समान पातळीवरील भागीदार आहेत.”

ग्राहकहित दिनाचा प्रस्ताव

उद्योगांचा ग्राहक हा एखादा व्यक्ती असो वा देश, त्याला केंद्रस्थानी ठेवूनच व्यवसाय केला जावा, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. या वेळी मोदी यांनी ‘आंतरराष्ट्रीय ग्राहकहित दिना’चा प्रस्ताव ठेवला.

१५ मार्च http://जागतिक ग्राहक हक्क दिनअसतो, असे सांगत मोदी म्हणाले की,”आपण ज्यावेळी ग्राहकांच्या हक्कांबाबत बोलतो, त्यावेळी त्यांच्या हिताचाही विचार करणे आवश्‍यक ठरते.

शिवाय, हा विचार केल्याने हक्कांचे संरक्षणही आपोआपच होणार आहे. त्यामुळे ग्राहकहित दिनाचा नक्की विचार करावा आणि यादिवशी जगभरातील उद्योगांनी ग्राहकांच्या हिताचे आणि पर्यायाने आपल्या स्वत:च्याच बाजारपेठेचे संरक्षण करण्याची शपथ घ्यावी.

पंतप्रधान मोदी म्हणाले…

– पुरवठा साखळीतील विस्कळीतपणावर भारत हे उत्तर

– उद्योग हे ग्राहककेंद्री असावेत

– दुर्मिळ धातूंच्या उपलब्धतेत असमानता

– प्रत्येकालाच विकासाची समान संधी मिळायला हवी

– उद्योगांनी त्यांच्या व्यवसायाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचाही विचार करावा

– प्रश्‍न सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!