Google Ad
Uncategorized

नवी सांगवी च्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज’ यांच्या संयुक्तविद्यमाने शिक्षक दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.५ सप्टेंबर २३ सप्टेंबर) : प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज यांच्या संयुक्तविद्यमाने शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जगताप सर व प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती पवार मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे,कॉलेजच्या प्राचार्य इनायत मुजावर मॅडम व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका जयश्री माळी मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली.

प्रथमतः विद्यार्थ्यांनी ईशस्तवन करून शिक्षकांच्या प्रति आदराची भावना म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्व गुरूंना मानवंदना दिली. विद्यार्थी प्राचार्य अनुष्का तेलंगी व स्वाती पवार मॅडम यांची भूमिका साकारणारी रिया धोंगडी हिचे अभिनंदन इनायत मुजावर मॅडमनी केले. विद्यार्थी शिक्षक झालेल्या प्राथमिक माध्यमिक व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयाचा मनमुराद आनंद कसा घेतला हे सांगताना प्राचार्य ते शिक्षक झालेले विद्यार्थी खूप आनंदात होते.

Google Ad

नंतर सर्व शिक्षकांचा मुलांनी पुष्प व तुळशीचे रोप देऊन शिक्षकां प्रती आदर व्यक्त केला अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी व मुलांना उत्साहित करण्यासाठी सर्व जुनियर कॉलेज आणि माध्यमिक शिक्षक स्टाफ यांनी कष्ट घेतले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष विजू अण्णा जगताप, सचिव शंकर जगताप, प्रा.बामणे सर, मा.डॉ.विकास पवार, विरेन जगताप व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. एक नवीन अनुभव घेऊन विद्यार्थी शिक्षकांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!