Categories: Editor Choice

नवी सांगवी आता होणार अधिक स्मार्ट … सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे कामकाज महापालिकेच्या स्थापत्य विभाग अंतर्गत करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन चिंचवड विधानसभेचे आमदार मा. लक्ष्मणभाऊ जगताप, शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरवठा आणि संरक्षण विभागाकडे हा रस्ता रुंद होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आज दिसून आले. या रस्त्यामुळे नवी सांगवीचा चेहरामोहरा बदलून जाणार हे मात्र नक्की …

नवी सांगवी-पिंपळे गुरवमध्ये प्रवेश करतानाचा हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची नेहमी मोठी वर्दळ असते, रस्त्याच्या होणाऱ्या या कामामध्ये सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा येथील ८०० मीटर लांब, १२ मीटर रुंदी असणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण UTWT पद्धतीने करण्यात येणार आहे. याकरिता रुपये ८ कोटी २५ लाख ३४ हजार ६१० इतका निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन, पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. हे कामकाज १८ महिन्यात पूर्ण होणार असल्याचे स्थापत्य विभागाचे अभियंता विजयसिंह भोसले यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले, नगरसेवक शशिकांत कदम, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, भीमराव चौधरी, जल:निस्सारण विभागाच्या प्रीती यादव, पाणी पुरवठा विभाग राहुल पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्याने ननागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

4 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

4 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago