Google Ad
Uncategorized

नमो ग्रुप फाऊंडेशनने मानले पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांचे आभार आणि आरोग्य कर्मचारींसाठी केली पदोन्नतीची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ फेब्रुवारी) : भारतीय जनता पार्टी नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत आज पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच आमदार महेश दादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप व आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये केलेल्या विशेष कामगिरी बाबत नमो फाउंडेशन यांनी आभार मानले.

तसेच स्वच्छ भारत अभियानात आणि या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अहोरात्र मेहनत घेणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील पदांची उदाहरणार्थ सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक ,आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य मुकादम अशा विविध सर्व संवर्गातील पदांची 100% रिक्त पदे तातडीने विभागीय पदोन्नती समिती गठीत करून सर्व पदांचे पदोन्नती करणे कामी आज निवेदन देण्यात आले.

Google Ad

तसेच प्रशासन विभागाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी देखील सर्व पदांकरिता उद्या विभागीय पदोन्नती समिती गठित करणार असल्याचे सांगितले.नमो फाउंडेशन चे महामंत्री भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमोदजी परदेशी यांच्यासमवेत शिष्टमंडळाने भेट घेतली. संपूर्ण मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन माननीय उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभाग यांनी दिलेले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!