पिंपरी येथील एका चिटफंड व्यावसायिकांचे अपहरण करून खून … खळबळजनक घटनेने शहर हादरले!

महाराष्ट्र 14 न्यूज : मोरवाडी पिंपरी येथील एका चिटफंड व्यावसायिकांचे अपहरण करून खून करण्यात आला. शनिवारी रात्री या व्यवसायिकाचा महाड मध्ये मृतदेह आढळून आला आहे. आनंद साहेबराव उनावणे (वय- ४५ रा. नर्मदा बिल्डिंग, मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. आनंद यांचे गुरुवारी (दि.४) राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते.

याप्रकरणी आनंद यांचे भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद उनावणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासत असताना नातेवाईकांकडून माहिती मिळाली, की एक अनोळखी मृतदेह महाड तेथे आढळून आला आहे.

महाड पोलिसांकडून मिळालेले फोटो आणि आनंद यांचे वर्णन मिळते जुळते होते. नातेवाईकांना घेऊन पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मृतदेह आनंद उनावणे यांचा असल्याचे सांगितले. अद्याप आनंद यांच्या फोनचे लोकेशन दुसरीकडे दाखवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago