Categories: Editor Choiceindia

Mumbai : चिंताजनक … महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती अस्थिर

महाराष्ट्र 14 न्यूज : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या साता समुद्रा पार पसरलेली आहे. अभिनयातले बिग बी आणि खऱ्या आयुष्यातील बिग बी हे दोन्ही पात्र चाहत्यांच्या फार जवळचे आहेत. पण आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. बिग बींची परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.

महत्त्वाचं म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.

T 3827 – !!!!!! ?????
– Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2021

‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं ब्लॉकच्या माध्यमातून सांगत त्यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. बिग बीचं हे छोटं वाक्य चाहत्यांच्या मनातील चिंता वाढवत आहे. त्यामुळे आता चाहते बिग बींच्या पुढच्या ब्लॉगच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, बिग बी आपल्याला ‘चेहरे’, ‘झुंड़’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

4 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago