पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोवीड -१९ लसीकरणाला महापालिकेच्यावतीने आजपासून सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१ मार्च २०२१) : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोवीड-१९ लसीकरणाला महापालिकेच्यावतीने आजपासून सुरुवात झाली.

या लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामधून करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त राजेश पाटील, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता तिरुमणी, डाॅ.बाळासाहेब होडगर, डाॅ. करुणा साबळे आदी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार साठ वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोवीड१९ लस दिली जाणार आहे. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वय वर्षे ४५ ते ६० या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींनाही कोवीड१९ ची लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आठ कोवीड१९ लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय चिंचवड यांचा समावेश आहे.

या आठ ठिकाणी ही लस मोफत दिली जाणार आहे. शहरातील इतर ११ खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे, मात्र त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी कोवीड१९ चे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले. लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करु नये तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago