Mumbai : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार … किरीट सोमय्या यांनी वर्तवलं भाकीत

महाराष्ट्र 14 न्यूज : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असं भाकित भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी वर्तवलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असंही ते म्हणाले .

किरीट सोमय्या हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असेही त्यांनी विचारले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे देखील उपस्थित होते.

टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख त्या चॅनेलवाल्यांना का घाबरत आहेत. एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. तसेच, ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. तर, याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago