Google Ad
Uncategorized

Mumbai : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मार्च) : ०२ मार्च रोजी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला, यात चिंचवडमधून अश्विनी जगताप तर कासब्यातून रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. आज महाराष्ट्र विधिमंडळा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरा आठवडा आहे. आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्राच अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीच विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप व रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली आहे. नवनिर्वाचित आमदारांचा आज विधिमंडळ सभागृहात शपथविधी पार पडला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधिमंडळ सभागृहात शपथविधी पार पडला. शपथविधि पार पडल्यानंतर आता या दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.

Google Ad

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक लागली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. तसेच कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपला बालेकिल्ल्यातच धंगेकरांनी मोठे खिंडार पाडले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची विजय खेचून आणला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!