Mumbai : इंडियन ऑईल , रिलायन्स जिओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी … अर्ज कुठे ?, कसा ?, करावा

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतात सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायंस जिओने (Reliance JIO Recruitment)चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. जिओ आपल्या भरती प्रक्रियेत फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना संधी देणार आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या वेबसीईटवर जिओ कंपनीने पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहता येईल. खासगी क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या तरुण, तरुणींना ही चांगली संधी आहे.

या पदांसाठी करु शकता अर्ज :-

रिलायन्स जिओने 200 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अ‌ॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अ‌ॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी रिलायन्स जिओने अर्ज मागवले आहेत. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर रिलायन्स जिओकडून उमेदवारांची यादी https://careers.jio.com या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी वरील वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यावी.

इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजीनिअर असिस्टंट पदासाठी भरती :-

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ज्युनियर इंजीनिअर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. याविषयी IOCLने परिपत्रक काढले असून आपल्या http://iocrefrecruit.in या वेबसाईवर भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
IOCL एकूण 16 ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. इच्छुक उमेदवार 19 फेब्रवारी 2021 पर्यंत त्यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. एकूण 16 जागांपैकी 9 जागा खुला प्रवर्ग, 4 जागा ओबीसी प्रवर्ग, 2 जागा एसी प्रवर्ग आणि एक जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षित आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

ज्युनियर इंजीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्यासाठी केमिकल/रिफाईनरी अ‌ॅण्ड पेट्रोकेमिकल या क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. तसेच, बीएससी (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) केलेल्या उमेदवारांनासुद्धा या पदासाठी अर्ज करता येतील. खुला प्रवर्घ तसेच EWS च्या उमेदवारांसाठी कमीत कमी 50 टक्क्यांच्या गुणांची अट आहे. एससी/एसटी साठी ही मर्यादा 45 टक्के आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी डेप्यूटी जनरल मॅनेजर (एचआर), बरूनी रिफाइनरी, पीओ- बरूनी ऑयल रिफाइनरी, बेगुसराय बिहार – 851114 या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज पाठवण्याची अंतिम तारिख 27-02-2021 आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

22 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago