महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. 22 डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती. 31 डिसेंबर 2020 रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. 261 / 2020 अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
महापौर पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांना अखेर ताब्यात घेतलंय. गुजरात जामनगरमधून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, मुंबई पोलिसांचे पथक उद्या त्याला मुंबईत घेऊन येणार आहे. गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नावं मनोज दोढिया असून, तो 20 वर्षांचा आहे. हे कृत्य का केलं, याचा तपास मुंबई पोलीस लावत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगरमधून त्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला अटक केली जाणार आहे.
“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…