महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीकडून ६ गुन्हे उघडकीस आणले असून २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, दापोडी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, भोसरी, दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक- एक घरफोडी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सराईत गुन्हेगार जयंत याच्यावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत. इतर ५३ गुन्हे दाखल असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. आता सहा गुन्हे उघडकीस आले असून एकूण १०३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज कलगुटगे, पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, पोलिस उपनिरीक्षक सुरेश हिंगे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलिस फौजदार निशांत काळे, पोलीस हवालदार प्रमोद गोडे, पोलिस अंमलदार विजय पाटील, सहाय्यक पोलिस फौजदार एस. आर. वाघुले, पोलिस हवालदार शैलेश काळभोर या पथकाने केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल : 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…
आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…