Google Ad
Uncategorized

Pune : पुण्यात व्यापाऱ्यांचा विरोध मावळला अन,… महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवली बंद …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ऑक्टोबर) : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, त्यानंतर उघडली तरी चालतील, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेनंतर दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली.

Google Ad

▶️पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. तसा निर्णय पीएमपीएल प्रशासने घेतला आहे. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणाऱ्या बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत.
तर पीएमपीएल डेपोवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहेत. स्वारगेट बस डेपो बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, भाऊ करपे रस्त्यावर बसून आंदोलन केलं.

▶️महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!