Categories: Uncategorized

रुपीनगर येथील मराठवाडा युवा मंच आयोजित भव्य हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपस्थित राहणार मराठा संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : रुपीनगर येथे मराठवाडा युवा मंच यांच्या वतीने भव्य हरिनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांचे किर्तन ठेवण्यात आले आहे. सप्ताह सोहळ्याची सुरवात एकनाथषष्ठी दि. ३१ रोजी करण्यात आली. हभप शिवाजी महाराज वठबे नांदेड, हभप लक्षमन महाराज पाटील, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप.संग्राम महाराज भांडारे, हभप चंद्रकांत महाराज खळेकर, पांडुरंग महाराज गिरी, हभप उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन झाले. रविवार दि.७ रोजी सकाळी १० वाजता सप्ताह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत.

यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी दहा ते बारा या वेळेत सप्ताह सोहळ्याची सांगता श्रीक्षेत्र नारायण गड बीड येथील मठाधीपती हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. अशी माहिती मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे, उपाध्यक्ष सतीश कंठाळे,उपाध्यक्ष औदुंबर पाडुळे, सचिव सर्जेराव कचरे, कार्याध्यक्ष सोमनाथ मंडलिक, खजिनदार दीपक बोर्डे, खजिनदार उद्धव सरोदे, त्रिंबक मुळीक यांनी सांगितले. यावेळी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 day ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

2 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

5 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

6 days ago