Categories: ArticlesMaharashtra

मानलं ह्या पोरीच्या जिद्दीला … संकटाशी दोन हात करत न डगमगता करतीये आपले ध्येय साकार!

महाराष्ट्र 14 न्यूज : सलाम तुझ्या जिद्दीला!
स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत……हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार….दहावीत ९८ टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा…. पण परिस्थिती आडवी आली.

आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता.म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती.लॉकडाऊन मध्ये गावात अडकली…. आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले.गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठून असणार..?परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला…..त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती. सकाळी ७ ला घरातून जाते ती सायंकाळी ७ च्या आसपास येते.अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो…..

पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सुरू झाला….. पुन्हा संकट उभं राहिलं.पण ती डगमगली नाही…..ठाम राहिली.चार ही भावांनी डोंगरावरच एक छोटीसी झोपडी उभारून दिली.सध्या भर पावसात त्या छोट्याशा झोपडीतच निसर्गाच्या आणि पशु पक्षांच्या सान्निध्यात तिचा अभ्यासाचा दिनक्रम सुरू आहे.मानलं रावं या पोरगीला!!अभ्यासाशिवाय तिला काहीच सुचत नाही,असे तिचे घरवाले(कुटुंबीय) म्हणत होते.ध्येय साध्य करण्याची जिद्द ,महत्वकांक्षा मनात असेल तर अडथळे किती क्षुल्लक ठरतात ना..?खरंच मानलं रावं पोरगीला….
महेश सावंत यांच्या वाॅलवरुन……

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

8 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

15 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago