‘डार्क रूम मधला श्वास’ … फोटोग्राफर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केव्हा दिसणार?

महाराष्ट्र 14 न्यूज : “डार्क रूम मधला श्वास……!!

(फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय नाहींतर कला आहे आणि कलेला राजश्रय मिळाला तरच त्या कठीण काळात टिकू शकतात ..सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री पेशाने फोटोग्राफर आहेत तेव्हा ही बाब त्यांच्या लवकर लक्षात आली तर ह्यावेळी फोटोग्राफर्सच्या चेहऱ्यावर “स्माईल”दिसेल )

-आज जागतिक फोटोग्राफी दिन, मानवी आनंदाचे क्षण कैद करणा-या शेकडो फोटोग्राफर्सनाही कोरोनाचा जोरदार फटका दिला आहे फोटोग्राफर्सच्या सप्तरंगी दुनिया कोरोनामुळे अक्षरशः #डार्करूम झालीय, आणि आता आनंदाचे क्षण टिपणारे फोटो-कॅमेरे केवळ भय, चिंता आणि मृत्यू टिपू लागलेयत.
मात्र ज्यांना हे टिपणे शक्य झालं नाही त्यांनी आपला कॅमेरा बंद केला आणि आपल्यातल्या कलेला मुरड घातली , मात्र पोटाला मुरड घालणं शक्य नसल्याने फोटोग्राफी क्षेत्रात मागील पस्तीस वर्षांपासून कार्यरत असलेले संजय अपार आता त्यांच्याकडील भाड्याच्या स्टुडिओत चक्क भाजीपाला विकतायत तर त्यांच्याहीपेक्षा ज्येष्ठ असलेले “जसंतो” वयाच्या साठाव्या वर्षी कामाच्या शोधात आहेत.

तर या दोघांपेक्षाही वाईट अवस्था झालीय ती (arun gaykwad) अरुण गायकवाड यांची या माणसाने आपली अख्खी हयात फोटोग्राफीत घालवली उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अरुण वेड्या सारखं उठून पळायचे “तो” एक क्षण टिपण्यासाठी या माणसाने लाठ्या खाल्या, दगडफेक झेलली, कड्या, कपारी, डोंगर, नाले, गटार, भुयार पालथे घातले आणि नको नको त्यांना चमकविणारे असंख्य लोकांना ओळख देणारे अरुण आज मात्र एकाकी पडलयेत, अरुण ज्या दैनिकात काम करायचे त्याचं दैनिकाने त्यांच्या भविष्याचा सकाळ, सकाळीच अस्त केला….कोरोना आणलेल्या (तयार केलेल्या) मंदीच्या लाटेने त्यांची नोकरी वाहून नेली..

तिकडे पर्यटन स्थळ, सेल्फी पॉईंट आणि यात्रे-जत्रेत नेहमी दिसणाऱ्या शेकडो फोटोग्राफर्सचीही अवस्था यांच्यापेक्षा काही वेगळी नाहीय.. ह्या पैकी पर्यटनस्थळी असणाऱ्या फोटोग्राफर्सचा तर व्यवसाय सिझनवरच अवलंबून असतो, सिझनही किती तर वर्षातील केवळ दोन तीन महिन्यांचा यात्रा जत्रात फिरणारे वाघांचे, घोड्याचे TEDDY/पुतळे घेऊन फिरणारे फोटो ग्राफरही आपल्या गावात दुसऱ्या गावच्या फोटोग्राफर्सना येऊ देत नाहीत त्यामुळे त्यांनाही मर्यादा आहेत, या वर्षी ऐन लग्न सराई, पर्यटनाचा काळ आणि यात्रा-जत्रांचा काळ कोरोनाने खाऊन टाकला

-वर्षाविहाराला आल्या नंतर एखादी तरुणी चिंब भिजते त्यावेळी तिचे अश्लील /मादक फोटो काढण्याचा मोह कोण्याही विकृतला आवरता येणार नाही मात्र तिथे असणाऱ्या एकाही फोटोग्राफर कडून अस कृत्य कधीच घडलं नाही घडणारही नाही,
त्याही पुढे #न्यूड_फोटोग्राफी, #हाफ_न्यूड_फोटोग्राफी, #मॉडेलिंग_फोटोग्राफी,#पॉर्न_फोटोग्राफी, #प्रेग्नसी_फोटोग्राफी असे फोटोग्राफीचे कित्येक प्रकार आणि या खासगी फोटोग्राफीचे पहिले साक्षिदार हीच लोकं असतात ,मात्र काढलेले फोटो त्याच व्यक्तीच्या हातात देणे हा यांचा धर्म असतो आणि त्यांचा हा धर्म उभा आहे त्यांच्यातील ज्या भावनेवर उभारला ती भावना आहे प्रामाणिक पणाची जी मला अधिक भावते आणि म्हणूनच पर्यटन स्थळावर केवळ फोटोग्राफीचा व्यवसाय नाहीतर ही लोकं त्या स्थळाची आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षा करतात त्यांचे क्षण आणखी आनंदी करतात

खरंतर, स्मार्ट फोन्स आल्या नंतर अनेकजण त्यामध्येच आपल्या सुखदुःखाचे क्षण कैद करू लागला आणि या क्षेत्राला उतरती कळा लागली मात्र प्री-वेडिंग शूट, मॉडेलिंग फोटोग्राफीने पुन्हा हा व्यवसाय बहरु लागला, एकट्या महाराष्ट्रात ह्या व्यवसायत दरवर्षी सुमारे अडीच हजार कोटींची उलाढाल होऊ लागली, आता मात्र हा व्यवसाय ठप्प पडलाय आणि फोटोग्राफर रस्त्यावर आले, मात्र याही मंदीला संधी म्हणून बघणारे काही फोटोग्राफर तग धरून आहेत त्यातलचं एक नाव आहे #devdatta_kashalikar देवदत्त कशाळीकर

देवदत्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फोटोग्राफर आहेत ते माणसाला बघण्या आधी त्याचं सोंदर्य टिपतात ,देवदत्तच्या म्हणण्यानुसार “प्रत्येकामध्ये अद्भुत सोंदर्य असते मात्र ते बघण्याची दृष्टी प्रत्येकाकडे नसते” ज्या दिवशी सगळे त्या दृष्टीने एकमेकांना बघू लागतील तो दिवस मानवी जीवनातील सर्व भेद नष्ट करणारा ठरेल” मॉडेलिंग आणि निसर्ग फोटोग्राफी क्षेत्रात दिग्गज असलेले देवदत्त सध्या कोरोनाच्या काळ्या काळाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत त्यांना हा काळ महत्वाचा वाटतो खूप काही शिकवणारा वाटतो, इथे नाउमेद न होता फोटोग्राफर्सना पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि जाहिरात क्षेत्र त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरेल असा विश्वास त्यांना वाटतो

कशाळकरांचा आत्मविश्वास सार्थ ठरला तर फोटोग्राफर्सना मागील सहा महिन्यापासून मास्क ने झाकोळलेला लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा टिपताही येईल, मात्र तशी परिस्थिती कधी येणार हे आता तरी सांगता येणार नाही त्यामुळे हे क्षेत्र अंधारलयं…
अर्थातच कुठल्याही व्यवसायात चढ-उतार असतातच मात्र फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय नाहीये तर कला आहे आणि कलेला #राजश्रय मिळाला तरच त्या कठीण काळात टिकू शकतात, सुदैवाने राज्याचे #मुख्यमंत्री_उद्धव_ठाकरे पेशाने हाडाचे फोटोग्राफर आहेत त्यामुळे त्यांच्या नजरेला फोटोग्राफी क्षेत्रावर आलेल्या गडद ढगांचं दृश्य दिसलं असलेच असा विश्वास वाटतो तेव्हा आपल्या सिद्धस्ताने त्यांनी ते ढग बाजूला सारले तर ह्यावेळी फोटोग्राफर्सच्या चेहऱ्यावर “स्माईल”दिसेल….!!!

-गोविंद अ. वाकडे
NEWS 18 लोकमत

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago