Categories: ArticlesEducation

नवी सांगवी -पिंपळे गुरव मधील चाहत्यांकडून … ‘ अश्विनीताई जगताप’ यांना सोशेल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : माणसाला योग्य वेळी केलेली मदत ते कधीच विसरत नाहीत. यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांच्या लाडक्या ‘वहिनी’ काहीजण त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. अशाच या माईंचा वाढदिवस या दिवाळीत आगळा वेगळा ठरला.

अश्विनीताई लक्ष्मण जगताप’ यांना अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तळागाळात जाऊन करत असलेले माईंचे काम अतिशय चांगले आहे. पती आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून माई अहोरात्र संकटकाळी आपल्या माणसांना मदत करण्यात आघाडीवर असतात. त्यांच्या या स्वभावाने अनेक माणसं जोडली गेली , आणि एक प्रेमाचं गोड नात सांगवी-पिंपळे गुरव मध्ये तयार झालं ते आज अनुभवयास मिळते.

कोरोनाच्या संकटात ज्यांचा करता गेल्यामुळे दिवाळी सण करता आला नाही, या सणाला नाट लावू नये म्हणतात, त्यामुळे अशा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत स्वतः दिवाळी फराळ दिला, आणि त्यांची दिवाळी गोड केली.

समाजात काम करताना एखादे काम झाले नाही तरी चालेल, पण काम घेऊन येणाऱ्या माणसाला आपण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला याची जाणीव व्हायला हवी. जी चांगली माणसं काम करतात, त्याला अडथळे येतातचं. मात्र ते पार करुन जाणं हा ‘अश्विनी जगताप’ यांचा स्वभाव आहे. अनेक वर्षांपासून प्रतिभा महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या करिता अनेक उपक्रम राबवून त्यांच्या हाताला काम दिले. आपल्या घरातील एक असे ते अस्तने आपल्या कार्यकर्त्यांची चौकशी करत असतात. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधानसभेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना नवी सांगवी पिंपळे गुरवकरांनी दिलेल्या भरगोस मतदानातुन दिसून आले. चिंचवड मतदार संघ हा तुलनेत सर्वात मोठा, त्यामुळे नवी सांगवीत निवडणूक काळात पायही न ठेवता, अश्विनी जगताप यांच्या पाठबळावर त्यांच्या शब्दांवर जनतेने विक्रमी मतांनी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविले.

आपल्या भागाला नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न अश्विनी जगताप यांनी पती लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून केला, आणि करत आहेत. परिसरातील नागरिकही आपली अडचण काम हे त्यांना निःसंकोचपणे घरातील एक याप्रमाणे सांगतात, त्यामुळे नवी सांगवी- पिंपळे गुरवचा झालेला विकास हा डोळ्यांत भरण्यासारखा आहे. या विकासा बरोबरच पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला कायापालट भावी पिढीला एक वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही.

त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच अशा या माईंचा तर काहींच्या ताईचा वाढदिवस या दिवाळीत आगळा वेगळा ठरला. अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या चाहत्यांनी घरी येऊन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago