Google Ad
Uncategorized

महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त … अनुसुचित जमाती सेल राष्ट्रवादी काँग्रेस चे बचत गट मार्गदर्शन शिबिर संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ एप्रिल ) :  12 एप्रिल 2023पिंपळे गुरव येथे अनुसुचित जमाती सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे बचत गट मार्गदर्शन शिबिर पिंपळे गुरव येथील सह्याद्री आदिवासी प्रबोधन संस्थेच्या भालचिम सभागृहात संपन्न झाले. आयोजनात आदिम महिला महासंघ, आदिवासी समन्वय समिति, राजगृह लोकोत्तर बुध्दीष्ट धम्म विनय ट्रस्ट, यांचा सिंहाचा वाटा होता.

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अनु. ज. सेल राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विष्णू शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक ज्येष्ट कार्यकर्त्या नम्रता शिंदे होत्या
महापालिकेचे समूह संघटक अमोल कावळे यांनी महिलांना महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या दिव्यांगाना रोजगारासाठी अर्थसाहाय्य याबद्दल माहिती दिली तर समूह संघटिका वैशाली खरात यांनी बचत गट निर्मितीची पद्धत फायदे, आणि अनुदाने यांबाबत विश्लेषण केले.

Google Ad

समूह संघटिका विजया बांबळे यांनी महीलांच्या उद्योग व्यवसाय उभारणी करिता केंद्र व राज्य शासनाच्या विवीध कर्ज योजना, सबसिडी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले
उद्घाटक, आयोजक विष्णू शेळके यांनी उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांच्या माध्यमातून आठवडे बाजार आणि एक गट एक व्यवसाय हि संकल्पना मांडली
अध्यक्ष स्थानावरून नम्रता शिंदे यांनी महासंघाच्या कामकाजाचे आणि त्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विवीध विधायक उपक्रमांचे कौतुक करीत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठीं शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास महासंघाच्या 46 गटाच्या प्रतिनिधी, चिंचवड महिलाध्यक्षा ललिता वाजे, उज्वला कोरके, सुनिता ठोंगिरे, आशा धुमाळ, शैला बुरुड, दिपा कानगुडे, कमल गायकवाड, सत्यभामा भवारी, कमल दाते, जिजा शिंगाडे आदि प्रमुख महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला सरचिटणीस सुनिता कोळप, सूत्र संचालन सविता मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनु ज. सेल महिला शहराध्यक्षा सुशिला जोशी यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!