Categories: Editor Choice

Vita : महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ व विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने … विटा येथे वस्त्रोद्योग परीषद संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ व विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने विटा यंत्रमाग सभागृहामध्ये पारंपारीक विणकाम करणाऱ्या विणकरांच्या समस्यांबाबत विचारविनिमय व उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीमधे वस्त्रोद्योग परीषद संपन्न झाली . ही परिषद ऑफ लाईन व ऑनलाईन पद्धतीने झाली . इचलकरंजी , फलटण , पेठवडगांव , विटा , वडवणी , कोल्हापुर , नाशिक , पुणे , मुंबई ठिकाणाहून आदी परिषदेस उद्योजक उपस्थित होते .

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोष्टी सेवा मंडळांचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते होते . परीषदेच्या चर्चासत्रामध्ये वीज प्रश्न दरप्रश्री वीज तज्ञ प्रताप होगाडे , निर्यात संधीबाबत पॉवरलूम डेव्हलपमेंट एक्सपोट्र्सचे गजाननराव होगाडे , बँक क्षेत्रातील समस्यांबाबत इचलकरंजी जनता बैंक संचालक महेश सातपुते तर विकेंद्रीत यंत्रमागासमोरच्या समस्या व इचलकरंजी उपाययोजनांबाबत पॉवरलूम असशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी , देवांग समाज अध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी स्वागत केले .

प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळांचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी विणकाम व्यवसाय असलेल्या कोष्टी समाजाच्या पारंपारीक विणकाम क्षेत्रातील समस्यांबाबत या चर्चासत्रातुन चर्चा होऊन एक सर्वकष निवेदन राज्यातील व केंद्रातील शासन प्रतिनिधींना देऊन या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे . वीज तज्ञ प्रतापराव होगाडे यांनी महाराष्ट्रातील विद्यमान वीज दर व सवलतींबाबत माहीती देऊन शेजारच्या कर्नाटक , गोवा सारखी इतर राज्ये रोजगारनिर्मीतीसाठी वस्त्रोद्योगास देऊ करीत असलेल्या वीजदर सवलतींबाबत माहीती दीली व मार्गदर्शन केले .

गजाननराव होगाडे यांनी साध्या यंत्रमागावरदेखील निर्यातक्षम कापडउत्पादन घेता येते व वसेद्योगाच्या एकुण निर्यातीमध्ये साध्या यंत्रमागाच्या कापडनिर्यातीचा वाटा खुप मोठा असून केवळ ग्रे कापड विक्री करण्याएवजी मुल्यावर्धित कापड . उत्पादन करून फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी तरुण यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहीजे व त्यासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट कार्पोरेशन सहकार्यासाठी तयार असल्याचे सांगितले .

 किरण तारळेकर म्हणाले , विकेंद्रीत यंत्रमाग व्यवसाय गेल्या पांच सहा वर्षापासून कमालीचा अडचणीतुन जात असून याचे मुळ केंद्राच्या कापूस व आयात निर्यात धोरणामध्ये असुन कापसाचा समावेश कमोडोटी मार्केटमधे झाल्यापासुन दररोजच्या तेजीमंदीमुळे कापुस व पर्यायाने सुत व कापडदरात अस्थिरता येत असल्याने खरेदी विक्रीचे दिर्घकालीन धोरण घेता येत नसल्याचे नमुद केले तसेच कापुस व्यापारातील शुन्य व्याजदराचे प्रचंड भांडवल असलेल्या बहुराष्ट्रीय भांडवलदार कंपण्याचा हस्तक्षेप , साठेबाजी व कृत्रीम टंचाई करण्यामुळे व्यवसाय अस्थिर झाल्याने नमुद केले .

यावेळी अंकुशराव उकार्डे , उत्तमराव म्हेतर , नितीन गजानन दिवटे , राजेंद्र ढवळे , सुरेश म्हेत्रे यांचे मनोगत झाले . पत्रकार मिलिंद कांबळे , शितल सातपुते यांनी पाहिले . सुत्रसंचालन रामचंद्र निमणकर यांनी केले . सुरेश तावरे , सुनिल ढगे , अशोक भुते , भगवानराव गोडसे , दत्तात्रय ढगे , इचलकरंजीचे कोष्टी समाज अध्यक्ष विश्वनाथराव मुसळे , दयानंद लिपारे , मनोज खेतमर , अरुण वडेकर , सुधाताई ढवळे , प्राजक्ताताई होगाडे , वैभव म्हेत्रे , शिवाजीराव कलढोणे , विनोद तावरे , नितीन तारळेकर , उत्तमराव चोथे , सचिन रसाळ , राजू भागवत यांसह अनेक यंत्रमाग व्यवसायिक उपस्थित होते .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago