Categories: Uncategorized

Mumbai : जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण … पोलिसांचा तपास सुरु

महाराष्ट्र न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काळाचौकी परिसरात घडली आहे.या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

काळाचौकी परिसरात राहणाऱ्या सपना मगदूम या आपल्या घरी एकट्याच असताना, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली. जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. सपना मगदूम यांची तीन महिने पंधरा दिवसांची मुलगी वेदा मगदूम ही पलंगावर झोपली होती.
जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं.

पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली.
सपना मगदूम या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांची लहान मुलगी वेदा पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती तिने आपल्या बाळाचं अपहरण केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
बाळाचं अपहरण करणार्‍या महिलेचा वय साधारण ते 30 ते 35 वर्षाची असून ती आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिस या महिलेचा आणि बाळाचा शोध घेत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago