नवी सांगवीत अवतरली साक्षात ‘महालक्ष्मी’ … शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपाचे दर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज : शारदीय नवरात्रौत्सव सुरक्षित वावराचे नियमाचे पालन करून साजरा करण्याच्या सूचना प्रशानसाने दिल्या आहेत . करोना अद्याप नियंत्रणात आला नसल्याने नवरात्रात मंदिरे बंदच राहणार आहेत . सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम होणार नाहीत . त्यामुळे भाविकांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा , असे आवाहन विविध मंदिर प्रमुखांनी केले .

शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर घटस्थापना करून नवरात्र उत्सवास भाविकांच्या अनुपस्थितीत यंदा प्रारंभ झाला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमाने घटस्थापना होत असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शनिवारी सकाळी विधिवत पूजा करून घटस्थापना करताच मंदिर बंद करण्यात आले होते. नऊ दिवस केवळ पूजा केली जाणार असल्याचे पुजारी मंगेश दिवाण यांनी सांगितले.

औधोगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडच्या सौदर्यात भर घालणाऱ्या नवी सांगवीतील महालक्ष्मी मंदिराचे शिल्पसौंदर्य काही अप्रतिमच आहे . मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अगदी सुरेख आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे, वरच्या एका हातात गदा आहे , एका हातात ढाल आहे . खालच्या उजव्या हातात मातुलिंग , तर डाव्या हातात पानपात्र आहे . देवीच्या मुकुटावर शिवलिंग आहे . त्यावर नागफणा आहे . देवीचे वाहन सिंह आहे . कपाळी हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे . नाकात नथ आहे. अंगावर भरजरी पैठणी आहे . देवीचे हे वैभवशाली रूप आदिशक्ती सगुण साकाराचे दर्शन घडविते. त्यामुळे साक्षात कोल्हापूर ला येऊन ‘अंबा’ मातेचे दर्शन घेतल्याचे समाधान लाभते, असे येथे येणारे भाविक सांगतात.

शुभायास्तु महालक्ष्मीर्भवतां भवतारिणी । बिभ्रती शिरसा लिंगमशेषा घौघहारिणी ।।

“ महालक्ष्मीची नित्योपासना पहाटे पाच वाजता सुरू होते . रात्री अकरा वाजता शेजारती होते. देवीच्या चरणांवर दुग्धाभिषेक केला जातो आणि नित्योपासना सुरू होते . दुग्धाभिषेकानंतर गंध , पुष्प व वस्त्रादी उपचारांनी देवीची पूजा केली जाते . काकडा आणि कापूर लावून देवीला ओवाळले जाते , ही आरती सकाळी ७ .३० वा. आणि सायंकाळी ७ .०० वाजता केली जाते. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवला जातो ,रात्री निद्रा आरतीच्या अगोदर लोणी आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर निद्राआरती करून देवीला झोपविले जाते. यावेळी आरती दरम्यान भक्त मंदिराबाहेरुन देवीचे दर्शन घेत असताना दिसले. कोरोनाच्या काळात अशीच काळजी भक्तांनी घ्यावी हीच अपेक्षा …

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago