Categories: Editor Choice

लक्ष्मण जगताप यांनी केला पुन्हा चमत्कार … भाजपचे पाचही आमदार विजयी , राष्ट्रवादीचे दोन , शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जून) : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

आमश्या पाडवी आणि सचिन आहिर या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.

उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय हे चार उमेदवार विजयी झाले आहेत. आता लढत आहे ती भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात. भाजपने पाच उमेदवार दिले होते. तर इतर तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार दिले होते. आज सकाळपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यानंतर उमा खापरे पडतील आणि प्रसाद लाड विजयी होती अशी चर्चा होती. अशात आता भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यातच चुरस रंगताना दिसतं होती यातही प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे.

प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात खरी चुरस होती मात्र प्रसाद लाड पहिल्याच फेरीत निवडून आले आहेत. काँग्रेसने ही लढाई चुरशीची केली होती. मात्र भाजपने मैदान मारलं आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. राज्यसभेच्या वेळीही तिसऱ्या जागेत लढत होती. तर आज पाचव्या जागेसाठी लढत होती. अशात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची किमया साधली आहे. पाचव्या जागेवर प्रसाद लाड निवडून आले आहेत.विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बीजगणित,अंकगणित घोडेबाजार अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अंकांची ही जुळवाजुळव व्यवस्थित जमवली गेली आणि भाजपने मैदान मारलं आहे.

विधान परिषद निवडणूक

विजयी उमेदवार, कोणाला किती मतं?

शिवसेना

सचिन अहिर – २६

आमश्या पाडवी – २६

भाजप

राम शिंदे – २६

श्रीकांत भारतीय – २६

प्रवीण दरेकर – २६

उमा खापरे – २६

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – २७

रामराजे नाईक निंबाळकर -२६

काँग्रेस

भाई जगताप – २६

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

9 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

9 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

19 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

20 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago