Categories: Editor Choice

नवी सांगवीतील कृष्णा चौकाने घेतला अनेक महिन्यांनंतर मोकळा श्वास … ऐन दिवाळीत नागरिकांची झाली वाहतूक कोंडीतून सुटका

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरात मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, ती सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते, याला शहरातील नवी सांगवी- पिंपळे गुरव ही अपवाद नाही.

नवी सांगवी – पिंपळे गुरवच्या सीमा रेषेवर असणारा कृष्णा चौक … खड्ड्यांमध्ये वाहने आदळून रस्त्यांवर धूळच-धूळ पसरत होती. ही धूळ दुचाकीचालकांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यांत जात असल्याने नवी सांगवीकरांसह बाहेरील वाहनधारक हैराण झाले होते. परंतु विकास करायचा म्हटलं की थोडीफार अडचण ही काही दिवस सहन करावीच लागते. परंतु त्यानंतर जे असेल ते अगदी भव्यदिव्य असेल हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ‘आमदार लक्ष्मण जगताप‘ यांच्या माध्यमातून नवी सांगवी पिंपळे गुरवची शहरातील स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवड झाली आणि आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे, या भागाचा कायापालट झाल्याचे आज दिसू लागले आहे, त्यामुळे आमदार जगतापांच्या या चांगल्या कामाची शहरात सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे.

‘जगात काय नवे ते पिंपरी चिंचवड ला हवे’ या जगताप यांच्या दूरदृष्टीने शहरात प्रशस्त असे स्मार्ट रस्ते, ग्रेड सेपरेटर, स्मार्ट फुटपाथ, विजेचे खांब, लिनीयर गार्डन, राजमाता जिजाऊ उद्यानासारखे दुबईच्या धर्तीसारखे एलिव्हटेड गार्डन येथील नागरिकांना खुणावते आहे. या विकासामुळे येतील नागरीकरण वाढले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांची आणि विविध कामे हाती घेतली आहेत. महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करून रस्ते स्वच्छ करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती आणि प्रशासनाने तातडीने रात्रंदिवस काम करून ऐन सणासुदीच्या काळात नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील गर्दीत हरवलेला खाऊ गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेला कृष्णा चौक नागरिकांकरीता पूर्णपणे खुला केला आणि पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे आज पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

3 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago